परभणी (मोहसीन खान)
परभणी शहर महानगरपालिकेच्या विषय समित्या व स्वीकृत सदस्याच्या नेमणुकीसाठी येत्या 18 मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सभेत स्थायी समिती सभापती, तिन्ही प्रभाग समितीचे सभापती यासह गटनेता, या पदांची निवड होणार आहे. परभणी महानगरपालिकेत एकूण पाच स्वीकृत सदस्य निवडून दिले जाणार आहेत. यात शिवसेना उभाठा चे दोन, भाजपाचा एक काँग्रेस एक व राष्ट्रवादी काँग्रेस एक असे एकूण पाच स्वीकृत सदस्य निवडले जातील यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत शहरातील मुस्लिम समाजाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना भरभरून मते दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 26 नगरसेवकांपैकी तब्बल 13 नगरसेवक मुस्लिम निवडून आले आहेत. मुस्लिम मताधिक्याचा आदर ठेवत शिवसेना उबाठा ने सय्यद इकबाल यांना महापौर करून मुस्लिम समाजाचा सन्मान केला. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 11 सदस्य महानगरपालिकेत निवडून आले आहेत. त्यात सहा सदस्य मुस्लिम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वीकृत सदस्य म्हणून पक्षातील ज्येष्ठ मुस्लिम नेत्यांचा विचार करावा अशी मागणी आता मुस्लिम समाजाकडून पुढे येत आहे. स्वीकृत सदस्याच्या निवडीबाबत पक्ष काय निर्णय घेईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

إرسال تعليق