परभणी मनपाच्या स्वीकृत सदस्यासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल


शिवसेना उबाठा चा अर्ज्  दाखल नाही




परभण(प्रतिनिधी)

महानगरपालिकेच्या नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे सोमवार 16 मार्च रोजी भाजपा राष्ट्रवादी व अन्य असे प्रत्येकी एक एकूण तीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.


परभणी शहर महानगरपालिकेच्या विशेष समिती व सदस्यांची नेमणूक करण्याबाबत महाराष्ट्र महानगरपालिका मधील नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या 23 मार्च 2023 च्या राज्यपत्रातील अधिसूचनेन्वये परभणी शहर महानगरपालिकेच्या नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या करणे बाबतचा अर्ज भारतीय जनता पक्षाच्या वतीने गटनेत्या तिरूमला मुकूंद खिल्लारे यांनी शिवाजी शेषेरावजी भरोसे यांचा अर्ज दाखल केला. यावेळी गटनेत्या तिरूमला मुकूंद खिल्लारे, शिवाजी भरोसे, मुकूंद खिल्लारे, पप्पु गायकवाड उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने गटनेते विजयराव जामकर यांनी शेख फहाद शेख हमीद यांचा नामनिर्देशित सदस्य म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते विजयराव जामकर, शेख फहाद शेख हमीद, बाळासाहेब बुलबुले, अक्षय देशमुख, आकाश लहाणे , अब्दुल कमील, अब्दुल रहीम, अर्जुन सामाले, शेख वसिम, आखिल काजी आदींची उपस्थिती होती. तर तिसरा अर्ज राहुल मुरकुटे यांचा दाखल करण्यात आला. यावेळी सागर गंगाळे, मोहम्मद फारूख, बबलु टाक, मिलिंद बामनीकर, रितेश जैन आदी उपस्थित होते. यावेळी महानगरपलिकेचे माहीती व जनसंपर्क राजकुमार जाधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...