⚡ महत्त्वाची बातमी

 महानगरपालिकेच्या

सभागृह नेतेपदी सय्यद समी उर्फ माजुलाला 

यांची निवड




परभणी (प्रतिनिधी)

महापालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा बुधवार 18 मार्च रोजी  दुपारी बी.रघुनाथ सभागृहात संपन्न झाली या सभेत सभागृह नेतेपदी सय्यद समी उर्फ माजुलाला यांची निवड करण्यात आली तर स्वीकृत समिती सदस्यांच्या निवडी महापौरांनी पुढील बैठकीत घेण्याचे घोषित केले. तर या सभेत शिवसेना उबाठा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शहर विकास आघाडीचे स्थायी समिती सदस्य निश्चित झाले. भाजपच्या सदस्यांची निवड  तांत्रिक बाबींमुळे निवड झाली नाही. महापौर सय्यद इकबाल यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा संपन्न झाली याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, नगरसचिव विकास रत्नपारखी आदींची उपस्थिती होती सभेची सुरुवात वंदे मातरम् आणि राज्य गीताने करण्यात आली. प्रशासनातर्फे महापौर, उपमहापौर यांचा प्रथम सभेत सन्मान करण्यात आला. सभागृह नेता म्हणून शिवसेना उबाठाचे  सय्यद समी उर्फ माजुलाला यांची निवड झाली. शिवसेना उबाठा, काँग्रेस, शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या स्थायी समितीच्या सदस्यांची नावे गटनेत्यामार्फत प्राप्त झाली होती, ती महापौरांनी सभागृहासमोर सादर केली. एकूण 7 विशेष समित्यांवरील सदस्यांच्या नावाबाबत उद्धव सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शहर विकास आघाडी यांनी पत्र दिले. ती नावे मान्य झाली.  तर उद्धवसेना आणि काँग्रेस यांची नावे आली नसल्याने सर्व सदस्यांची नावे पुढील बैठकीत घेण्यात येतील, असे महापौर सय्यद इकबाल यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक भगवानराव वाघमारे, राष्ट्रवादीचे विजय जामकर यांनी पुठील महिण्यात बैठक घेण्याची भूमिका मांडली. 

स्थायी समिती सदस्यांची नावे  नाव प्रस्तावितकरणारे गट नेताशिवसेना उबाठाचे गटनेते दिलीप ठाकुर यांनी स्थायी समिती सदस्य म्हणून सरोदे प्रतिभा) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नौशीन अलीम कुरेशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) डहाळे व्यंकट लक्ष्मणराव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शेख रईस शेख हबीब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)राजापुरे प्राप्ती विकास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)भालेराव सुलोचना मदनराव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)तर कॉंग्रेसचे गटनेते गुलमीर खान यांनी  वाघमारे भगवान नारायणराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशमुख सुनिल जनार्धनराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इनामदार नदीम अहेमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते विजय जामकर यांनी  आकाश गोविंदराव लहाने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीअक्षय दिलीपराव देशमुख नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीअर्जुन सुभाषराव सामाले नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीगंगाळे सागर रणजीत शहर विकास आघाडी  गंगाळे सागर रणजीत

यांची नावे महापौर सय्यद इकबाल यांच्याकडे नावे प्रस्तावीत केले आहेत.त्यानंतर महापौर सय्यद इकबाल यांनी नावे जाहीर केले.

Post a Comment

Previous Post Next Post
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...