आज पासून भिगवन मध्ये राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन..., यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष...

 





भिगवण प्रतिनिधी दि. 14 फेब्रुवारी 2026.

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शिवजयंती उत्सवानिमित्त राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा भिगवन संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे. यंदाचे व्याख्यानमालेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने व्याख्यानमालेची तयारी जोरात सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शनिवार दिनांक 14 / 2 / 2026 ते बुधवार दिनांक 18 / 2 / 2026 पर्यंत पाच दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 14 / 2 / 2026 रोजी सायंकाळी 07.00 वाजता  एस. के. कलेक्शन शिवरत्न मंगल कार्यालय पुणे सोलापूर हायवे भिगवन येथे होणार असून, मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे तसेच बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे व मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडे साहेब हे उपस्थित राहणार आहेत..

यावेळी व्याख्यानमालेसाठी प्रथम पुष्प म्हणून हास्य कवी व ज्येष्ठ साहित्यिक मुंबई अशोक नायगावकर यांचे "मिस्किली आणि कविता" या विषयावर व्याख्यान होणार आहे.

द्वितीय पुष्प न्यूज 18 मराठी मुंबईचे पत्रकार विलास बडे यांचे "जीवन चक्रातील आजचा अभिमन्यू" या विषयावर व्याख्यान होणार आहे. 

तृतीय पुष्प चित्रपट अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे यांचे महिलांनो "आबला नाही तर सबला व्हा..!"  या विषयावर व्याख्यान होईल. 

चतुर्थ पुष्प शिवव्याख्याते हिंगोली शेख सुभान अली यांचे "मानवतावादी, छत्रपती शिवाजी महाराज..!" या विषयावरील व्याख्यान होईल. 

पाचवे पुष्प राष्ट्रपती शौर्य पदक विजेते रत्नागिरी कमांडो मधुसूदन सुर्वे यांचे "ध्येय आणि समर्पणाची शौर्यगाथा..!" या विषयावरील व्याख्यान होईल. 

प्रतिवर्षीप्रमाणे देण्यात येणारा राजमाता जिजाऊ भूषण पुरस्कार यावर्षी मस्यजोग जिल्हा बीडचे दिवंगत सरपंच संतोष भैया देशमुख यांच्या मातोश्री शारदाबाई पंडितराव देशमुख यांना देण्यात येणार आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...