झोपेत असलेल्या महिलेवर केला अत्याचार दागिने व रोख रक्कम ही लंपास केली



परभणी शहरातील वकील कॉलनी परिसरातील घटना 


नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल


गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला केली अटक

परभणी (प्रतिनिधी) शहरातील वकील कॉलनी परिसरातील मोकळ्या मैदानात  ईद यात्रेदरम्यान जम्पिंग झुला लावून झोपेत असलेल्या महिलेवर अत्याचार करून रोख रक्कम व मंगळसूत्र चोरल्याची घटना 20 मार्च रोजी पहाटे घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी अधिक माहिती अशी की, शहरातील एकबाल नगर परिसराच्या लगत असलेल्या वकील कॉलनी येथील पाढेला फंक्शन हॉल समोरील मोकळ्या मैदानात ईद निमित्त छोटे झुले लावण्यासाठी एक कुटुंब आले होते. शनिवार 21 मार्च रोजी दिवसभर मुलांना खेळवून उदरनिर्वाह केला. याच दरम्यान परिसरात फिरणारा एक तरुण ग्राहकांना त्रास देत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. रात्री उशिरा काम आटोपून पती-पत्नी झंपींग झुल्यावर झोपले असताना 22 मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. महिला जागी होताच आरोपी घटनास्थळावरून हातात आपले कपडे घेऊन पसार झाला. घटनेनंतर महिलेने तपासणी केली असता तिच्या पर्समधील सुमारे 30  हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे तसेच च्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास झाल्याचे उघड झाले. परिसरात चौकशी केली असता संबंधित आरोपीचे नाव दानिश कुरेशी वय 20 वर्षे असल्याचे समोर आले. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून दानिश कुरेशी याच्याविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटेनाचा पुढील तपास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोनि महादेव मांजरमकर हे करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी लवकरच तपास सकरे फिरवून गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरच आरोपीला अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...