महानगरपालिकेने मंदिरातील मारुतीची मूर्ती हटवलीओट्यासह शेड केला जमीन दोस्त

मंदिरातील मुर्ती हटविल्याच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाद्वारे  निदर्शने

 परभणी,(प्रतिनिधी) शहरातील   वांगी रस्त्यावरील अपना नगर भागात एका तीन शेडमध्ये मंदिर उभारून त्यात मारोती ची मूर्ती ठेवण्यात आली होती. शेड मध्ये असलेल्या या मंदिरातील मारोतीची मुर्ती महानगरपालिकेच्या एका पथकाने आज मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात हटवली सोबत या ठिकाणी असलेल्या ओट्यासह टीनशेड जमीनदोस्त करण्यात आले. महानगरपालिकेच्या या कारवाईच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजबांधवांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना हनुमानाची मुर्ती हटविल्यासह ओटा व शेड जमीनदोस्त केल्याबद्दल जाब विचारला. गेल्या नऊ वर्षांपूर्वी मारोतीची या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. परिसरातील हिंदु बांधव रोज या मंदिरात पुजापाठ करीत आले आहेत. या मंदिराचा कोणालाही त्रास नाही. असे असतांना महापालिकेच्या पथकाने मंगळवारी पहाटे 3 वाजता पोलिसांच्या फौजफाट्यासह मंदिरातील मुर्ती हटविली व मुर्तीची विटंबना केली. मंदिराच्या ओट्याची तोडफोड करुन शेड जमीनदोस्त केले. या संबंधीची कारवाई भल्या पहाटे तीन वाजता कोणत्या अधिकार्‍याने केली व का केली याचा खूलासा करावा, अशी मागणी भरोसे यांनी केली.


 यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी हे बेकायदेशीर कृत्य करणार्‍या अधिकार्‍यांविरुध्द कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

Post a Comment

Previous Post Next Post
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...