एलसीबीच्या पोलिसांनी पाठलाग करत पकडला प्रतिबंधित गुटखा

3 लाख 20 हजार 75 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पालम (प्रतिनिधी)


तालुक्यातील फरकंडा-गुळखंड परभणीच्या एलसीबीच्या पथकाने धाड टाकत प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या कारवाईत 52 हजारांचा गुटखा आणि वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालम तालुक्यातील मौजे फरकंडा ते गुळखंड दरम्यान प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती परभणीच्या एलसीबी च्या पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान, लोडिंग महिंद्रा जितो वाहनातून गुटखा नेला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांच्या मोटरसायकलला धडक देण्याचा प्रयत्न करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान वाहनात 52 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. याप्रकरणी पोलीस शिपाई एस. एन. सावंत यांच्या फिर्यादीवरून विष्णू दत्तराव दुधाटे आणि बापुराव श्रिनिवार यांच्याविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत गुटखा व वाहन असाएकूण 3 लाख 20 हजार 75 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक परिहार, पोहेकॉ लक्ष्मण कांगणे, माणिक वाघ, पोशि. शरद सावंत यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. खटाणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे करत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...