चोरी करणारी टोळी उघड
परभणी(प्रतिनिधी)
जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणातील एका आरोपीस स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मानवत परिसरातील रूढी येथून ताब्यात घेतले. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार परभणी पोलिसांना सदर टोळीची उकल करण्यात यश आले.
जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्यात गुरनं 46/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणातील आरोपी एका कारने वालूर परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, जगताप पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, चाटे, कवटाळे, परसोडे, क्षिरसागर, डुबे, चव्हाण, ढवळे, पौळ, हनवते, कश्यप साने याचं पथक पाथरी रोडवरील पेडगाव परिसरात गस्तीवर होते. पथकास या संदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर पथक तात्काळ वालूर परिसराकडे रवाना झाले. याचवेळी आरोपी एका कारने वालूर मार्गे पाथरीकडे फरार होण्याचे प्रयत्नात आसल्याचे आढळून आले. पथकाने सदर कारचा पाठलाग करून कारला मानवत रोड परिसरातील रूढी पाटीवर थांबविले. कारमध्ये पथकाला संशयीत आरोपी मिळुन आला. पथकाने चौकशी केली असता त्याने त्याचे नाव जायका तुकाराम शिंदे (रा. केरी जि. सोलापुर )असे सांगीतले. दरम्यान, कार चालकास आरोपीच्या सामाना बाबत विचारले असता त्याने त्याची गाडीच्या डिकीतुन एक पाढऱ्या रंगाची थैली काढुन पथकाला दिली. थैलीची पाहणी केली असता त्यामध्ये एक टांबी, पोपट पान्हा व एक मारतुल असे साहीत्य निघाले.
यावरून आरोपी हा चोरी प्रकरणातील नियमित सवयीचा असल्याची माहिती पुढे आली. आरोपीस पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार अनंद्या राजकुमार काळे (रा. कोरफळे, जि. सोलापूर), लल्या भोसा शिंदे, संतोष वैजनाथ भोसले, अजश किरण भोसले यांच्या सोबत बामणी, जिंतूर परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. तपासा दरम्यान बामणी परिसरातील घरफोडीतून आरोपीच्या हिश्याला आलेले 60 हजार रूपये आणि जिंतूर परिसरात केलेल्या गुन्ह्यातील एक तिजोरी भंगारमध्ये विकून आलेले 12 हजार रूपये जप्त करण्यात आले. पुढील कारवाईसाठी आरोपीला बामणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Post a Comment